बालभवन – गमत शाळा: मुलांना घडवणारे वैज्ञानिक प्रयोग

खेळातून शिकूया… अनुभवातून घडूया… आणि समजून पालकत्व करूया!

मुलांना फक्त शिकवायचे नाही, त्यांना शिकण्याची संधी द्यायची आहे. प्रयोग, खेळ, निरीक्षण आणि संवादातून मुलांचा सर्वांगीण विकास.

आमच्याविषयी

बालभवन – गमत शाळा, अकोला हा सुश्रुत क्लिनिक अंतर्गत राबवला जाणारा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीचा अनुभवाधारित शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आहे.

शाळा, क्लासेस आणि डिजिटल माध्यमांतून मुलांना माहिती भरपूर मिळते. पण स्वतः प्रयोग करणे, प्रश्न विचारणे, चुका करून शिकणे आणि इतर मुलांसोबत खेळणे यासाठी पुरेशा संधी हव्यात. तीच गरज बालभवन पूर्ण करते.

आमची दृष्टी

प्रत्येक मुलाला स्वतःच्या क्षमतांचा शोध घेता यावा, स्वतंत्र विचार करता यावा आणि आत्मविश्वासाने व्यक्तिमत्त्व विकसित करता यावे, यासाठी आनंददायी वातावरण निर्माण करणे.

आमचे ध्येय

  • जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची सवय
  • निरीक्षण, विचार आणि कल्पनाशक्ती
  • समस्या सोडवणे, संवाद, स्वावलंबन
  • मोबाईल आणि स्क्रीनपलीकडचे आनंददायी पर्याय

मुलांसाठी उपक्रम

प्रत्येक उपक्रम मुलांना स्वतः करून पाहण्याची संधी देतो.

प्रयोगातून शिक्षण

  • पाणी, हवा, प्रकाश, सावली, चुंबक, रंग
  • स्वतः प्रयोग करून नोंदी ठेवणे

निरीक्षण आणि शोध

  • Treasure Hunt, Nature Walk, Colour Hunt
  • वस्तू शोधणे आणि वर्गीकरण

कला आणि सर्जनशीलता

  • चित्रकला, हस्तकला, कागदकाम
  • टाकाऊतून टिकाऊ, मॉडेल बनवणे

खेळ आणि शारीरिक विकास

  • मैदानी खेळ, Obstacle Course, Team Games
  • Freeze Dance, Simon Says

भाषा आणि संवाद

  • गोष्टी सांगणे, चित्रांवरून बोलणे
  • गटचर्चा, भूमिका सादरीकरण

जीवनकौशल्य

  • Pretend Shop, Doctor Play
  • निर्णय, जबाबदारी, स्वावलंबन

तर्क आणि समस्या सोडवणे

  • कोडी, पझल्स, ब्लॉक्स, पॅटर्न
  • मेमरी आणि गणिती खेळ

वयोगट

३–६ वर्षे

खेळ, भाषा, हालचाल, निरीक्षण आणि पालक-मूल संवाद.

७–१० वर्षे

प्रयोग, विज्ञान, सर्जनशीलता, तर्कशक्ती आणि जीवनकौशल्य.

११–१४ वर्षे

नेतृत्व, निर्णयक्षमता, समस्या सोडवणे आणि आत्मविश्वास.

उन्हाळी शिबिरे आणि वर्षभराचे उपक्रम

सुट्टी फक्त मनोरंजनात न घालवता नवीन गोष्टी शिकणे, अनुभव घेणे, मैत्री करणे आणि स्वतःच्या क्षमतांचा शोध घेणे हा शिबिरांचा उद्देश आहे.

Science & Experiment CampArt & CraftNature ExplorationFun with MathematicsBrain GamesTeam BuildingStorytellingCreative ConstructionGroup Projects

वर्षभर शैक्षणिक भेटी, सण-उत्सव, बालदिन आणि थीम वर्कशॉपही होतात.

पालकांसाठी मार्गदर्शन

मुलांचा विकास फक्त शाळेत होत नाही. घरातील वातावरण, संवाद, अपेक्षा, शिस्त, स्क्रीनचा वापर आणि मुलांना मिळणारे स्वातंत्र्य यांचाही मोठा प्रभाव असतो. म्हणून आम्ही पालकांसाठी व्याख्याने, जागरूकता कार्यक्रम आणि Interactive Workshops घेतो.

“Understanding Children is the First Step Towards Better Parenting.”

१. बालसंगोपन आणि पालकत्व (वय ० ते १३ वर्षे)

मुलांचे वर्तन समजून घेणे, विकासासाठी योग्य वातावरण तयार करणे आणि रोजच्या पालकत्वातील प्रश्न सोडवणे.

  1. माझे मूल अभ्यास करत नाही – काय करावे?
  2. Concentration आणि Attention कसे विकसित करावे?
  3. मोबाईलच्या पलीकडे – मुलांना Busy नाही, Develop करूया!
  4. माझे मूल माझे ऐकत नाही – बालवर्तन समजून घेताना
  5. हट्टीपणा, राग आणि भावनिक बदल
  6. Positive Parenting – शिक्षा की समजावून सांगणे?
  7. …आणि आणखी अनेक विषय
२. किशोरवयीन मुलांचे पालकत्व (Teenage Parenting)

किशोरवय हा संक्रमणाचा टप्पा आहे. नियंत्रणापेक्षा समजून घेणे, संवाद, योग्य मर्यादा आणि विश्वासाचे नाते महत्त्वाचे ठरते.

  1. Understanding Teenage Behaviour – वर्तन समजून घेणे
  2. Teenage Brain Development – किशोरवयीन मेंदूचा विकास
  3. Emotional Changes – भावनिक बदल आणि व्यवस्थापन
  4. Peer Pressure – मित्रांचा प्रभाव
  5. Communication Gap – संवादातील अंतर
  6. Independence vs Discipline – स्वातंत्र्य आणि शिस्तीचा समतोल
  7. …आणि आणखी अनेक विषय
३. VISION – Experiment-Based Parenting Program

यात पालक फक्त व्याख्यान ऐकत नाहीत. ते स्वतः अनुभव घेतात, कृती करतात आणि मुलांच्या वर्तनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकतात.

  1. बालविकासाची वैज्ञानिक माहिती, Brain Development आणि Learning
  2. वयानुसार विकासाच्या गरजा
  3. घरच्या घरी करता येणारे छोटे प्रयोग
  4. पालक-मूल संवादाचे प्रात्यक्षिक आणि Parenting Tools
  5. Case Studies, चर्चासत्रे आणि प्रश्नोत्तरे

आमचा उद्देश पालकांना दोष देणे नाही, तर मुलांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी योग्य दिशा देणे हा आहे.

शाळांसाठी उपक्रम

शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय निर्माण करून मुलांसाठी सकारात्मक वातावरण तयार करणे.

Student Development WorkshopsParenting Awareness SessionsTeacher SensitizationScreen Time AwarenessChild Behaviour AwarenessConcentration & Learning SkillsEmotional DevelopmentCreative Thinking WorkshopsParent-Teacher Interaction

बालभवनचे क्षण

फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी टॅप करा.

सांगता समारंभात प्रमाणपत्रांसह बालभवनची मुलेबालभवन उपक्रमात सहभागी मुलेबालभवनची टीमपालकांसाठी व्याख्यानाला उपस्थित पालक व शिक्षक

पालकांचे अनुभव

सांगता समारंभ

मुलांचे उपक्रम

शाळा आणि प्रशिक्षण

लेख

नोंदणी आणि चौकशी

मुलांचे उपक्रम, शिबिरे, पालक व्याख्याने, शाळांसाठी कार्यक्रम आणि शैक्षणिक भेटी

7083510169

बालभवन – गमत शाळा, अकोला
सुश्रुत क्लिनिक अंतर्गत उपक्रम · अकोला, महाराष्ट्र